दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोनामुळे यंदाची शिवजंयंती अत्यंत साधेपणाने साजरी करण्याबाबत राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. १९ फेब्रुवारी रोजीची शिवजयंती साजरी करण्यासाठी या नियामवलीनुसार कोणतेही कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. तसंच शिवजयंतीची मिरवणुकही काढता येणार नाही, असं सरकारच्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे.


शिवजयंतीसाठी राज्य सरकारची नियमावली


- एका ठिकाणी १० लोकांनी एकत्र शिवजयंती साजरी करावी.
- पोवाडे, व्याख्याने, गाणे, नाटक अथवा इतर सास्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये.
- प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढू नये.
- आरोग्य विषयक शिबीरे, रक्तदान शिबीरे, जनजागृती सोशल डिस्टसिंग पाळून आयोजित करावीत.