मुंबई : उद्धव ठाकरे सरकारकडे 171 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा महाआघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. ठाकरे सरकारची आज अग्निपरीक्षा आहे. महाविकासआघाडीचं सरकार आज विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. त्यासाठी आजपासून दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. आजच्या बहुमत चाचणीत महाविकासआघाडीला १७० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचं संजय राऊतांचा हवाला देत अजित पवारांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेने आपल्या आमदारांना व्हिप जारी केला आहे. शिवसेनेकडून सुनील प्रभु यांनी आपल्या आमदारांना तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. विश्वासदर्शक ठरावासाठी शिवसेना आमदार विधानसभेत पोहोचले आहेत. विश्वासदर्शक ठरावावेळी इतर लहान पक्षांचा देखील आपल्याया पाठिंबा मिळेल असा शिवसेनेने दावा केला आहे.


दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील आपल्या आमदारांना व्हिप जारी केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजुने मतदान करण्याचा व्हिप जारी करण्यात आला आहे.



शिवसेना- 56
अपक्ष- 08
राष्ट्रवादी- 54
काँग्रेस- 44
सपा- 02
स्वाभिमानी शेतकारी संघटना- 01
बहुजन विकास आघाडी (बीवीए)- 03
मनसे - 01
पीडब्ल्यूपी - 01
सीपीआय (एम)- 01


विश्वासदर्शक ठरावाआधी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. हिंमत असेल तर गुप्त मतदान घ्या' असं आव्हान चंद्रकांत पाटलांनी महाआघाडीला दिलं असून खुल्या मतदानाला भाजपने विरोध दर्शवला आहे. तर भाजपच्या या आरोपाला प्रत्युत्तर देत खुलं मतदान नियमाला धरूनच असल्याचं नबाव मलिक यांचं म्हणणं आहे.