मुंबई : भाजपाकडे मांजरास वाघ आणि कुत्र्याचा हत्ती करण्याची कला असल्याचा आरोप शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून त्यांनी हा निशाणा साधला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश निवडणूक निकाल आणि गुजरात निवडणूकीवरील भाजपाच्या खेळीवर भाष्य करण्यात आले आहे. 


भाजपाला खोड 


 भाजपला आकडा फुगवून सांगण्याची खोड आणि आकडय़ांची खातरजमा न करता अभिनंदनाचे ‘ट्विट’ संदेश पाठविण्याची सवय पंतप्रधानांना असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी लगवला आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायती निवडणूक निकालांत याचा अनुभव आल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 


'विकास' जिंकल्याचा पोकळ दावा


 उत्तर प्रदेशात महानगरपालिका व नगरपालिकांच्या निवडणुकात शहरी भागात भाजपने सरशी खेचली. पण ग्रामीण भागात तसे घडले नसल्याचे उद्धव यांनी सांगितले. 


आकड्यांची हातचलाखी 


 उत्तर प्रदेशातील विजयी शंखनाद ही आकडय़ांची हातचलाखी आहे, पण नक्की आकडा काय लागला याबाबत संभ्रम आहे. उत्तर प्रदेशात ‘अपक्ष’ व इतरांचाही ‘विकास’ जिंकला. तरीही पुनः पुन्हा विकास जिंकत  असल्याचे दावे केले जात असल्याचा टोलाही उद्धव यांनी लगावला आहे.  


जिथे ईव्हीएम तिथे कमळ  


 जिथे ईव्हीएमने मतदान झाले, त्या महापालिकांमध्ये भाजपला यश मिळाले आणि जिथे ईव्हीएमने मतदान झाले नाही अशा ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र ‘कमळ’ फुलले नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.