मुंबई : 'आमच्या अयोध्या दौऱ्याआधी कारस्थानं करण्यापेक्षा मंदिर निर्माणाची तारीख का सांगत नाही ?' असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून कऱण्यात आलाय. 'रामाच्या नावावर मतांचा कटोरा घेऊन दारोदार फिरावे व निवडणुकांचा मोसम येताच सभा-संमेलनांतून ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्याव्यात ही जुमलेबाजी आमच्या रक्तात नाही' असा खुलासाही सामानातून करण्यात आलायं.


शिवसैनिक अयोध्येच्या दिशेने 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येत राम मंदिरासाठी येत्या दोन दिवसात जोरदार वादळ उठणार अशी शक्यता आता निर्माण झालीय. विश्व हिंदू परिषद आणि शिवसेना या दोन्ही संघटना राममंदिराचा मुद्द्यावर अयोध्येत वातावरण तापू लागलंय. उद्या आणि परवा असा दोन दिवसांचा उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा आयोजित करण्यात आलाय.


त्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक अयोध्येकडे निघाले आहेत. प्रत्यक्ष अयोध्येतही या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे.


सरकारला टोला 


'अयोध्येत इतक्या शिवसैनिकांचे काम काय ?, त्यांचा काही अंतस्थ हेतू वगैरे नाही ना ? अशा शंका उपस्थित का कराव्यात? तसे करण्यापेक्षा मेहेरबान सरकारने राममंदिर निर्माणाची तारीखच घोषित करावी', असे म्हणत सरकारला टोलाही लगावण्यात आलायं.