दहीहंडी, गणेशोत्सवातील अडचणींबाबत शिवसेनेचं मुख्यमंत्र्यांना निवेदन
दहीहंडी आणि गणेशोत्सवातील अडचणींबाबत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम आणि शिवसेनेच्या मुंबईतील आमदारांनी वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आमदार अनिल परब, सुनील शिंदे, मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, अजय चौधरी, तृप्ती सावंत यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
मुंबई : दहीहंडी आणि गणेशोत्सवातील अडचणींबाबत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम आणि शिवसेनेच्या मुंबईतील आमदारांनी वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आमदार अनिल परब, सुनील शिंदे, मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, अजय चौधरी, तृप्ती सावंत यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
गणेशोत्सव आणि दहीहंडी सणांच्या अडचणी संदर्भात तातडीची बैठक घेण्याबाबत शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय. शिवसेनेचा जन्म उत्सवातून आहे. तर भाजपाची सत्ता आल्यानंतर अनेक छत्री उगावल्यात, अशी टीका आमदार अनिल परब यांनी भाजपवर केली आहे.