मुंबई : आज जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातोय. प्रत्येकांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या प्रियजनांसोबतचे फोटो दिसतायत. अनेक सेलिब्रिटींनीही आपल्या जीवनसाथींसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. अशावेळी शिवसेना आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे कामानिमित्त दौऱ्यावर आहेत. त्यांना त्यांच्या व्हॅलेंटाईन बद्दल प्रश्न विचारण्यात आला. याला त्यांनी हसतमुखाने उत्तर दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकी दरम्यान आधी लगीनं कोंडाण्याचं असं म्हणतं आदित्य ठाकरेंनी लग्नाच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. आता निवडणुकीची धामधूम संपली आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. दरम्यान त्यांच्या प्रेमा बद्दलच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. सर्वात तरुण आमदार म्हणून ते ओळखले जातात. अशावेळी लाईफ पार्टनरचा विचार केलाय का ? असे प्रश्न त्यांना मुलाखती दरम्यान हमखास विचारले जातात. 


'झी २४ तास'च्या प्रतिनिधींनी त्यांना याबद्दल विचारले असता त्यांनी हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला. 'हा इंटरव्ह्यू आईने घरी बघू नये' असे उत्तर त्यांनी दिले. 



तुमच्यासोबतच आहे मी, वेगळं काही नाहीय आज... तुम्ही मला कोंडीत पकडू नका, मला काम करू द्या आणि अशी आशा करतो की माझी आई घरी हा इंटरव्ह्यू बघणार नाही असा खुलासा त्यांनी व्हॅलेंटाईन डे च्या प्रश्नावर दिला.