Aaditya Thackeray Visit Ayodhya: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर जात ( Aaditya Thackeray Ayodhya Visit ) आहेत.  अयोध्या दौऱ्यात आदित्य ठाकरे भगवान श्रीरामाच्या जन्मस्थळी दर्शन घेणार असून, संध्याकाळी अयोध्येतील शरयू नदीच्या किनाऱ्यावर आरती करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येत आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद होणार असून, अयोध्येतून आदित्य ठाकरे कोणावर निशाणा साधणार याची उत्सुकता लागली आहे. याआधी 10 जूनला आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित करण्यात आला होता. पण राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अयोध्या भेटीची तारीख बदलून 15 जून करण्यात आली.


उत्तर प्रदेशात शिवसेना संघटन मजबूत करण्याकडे आदित्य लक्ष देत आहे. आगामी महानगर पालिकांच्या निवडणुकांमध्ये मुंबईत असलेली उत्तर भारतीयांची संख्या पाहता हा दौरा त्यादृष्टीने ही शिवसेनेसाठी आणि हिंदुत्ववादी विचारांच्या मतांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.


संजय राऊत यांनी घेतला आढावा
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं खासदार संजय राऊत यांनी काल मॉक ड्रील केलं.  आदित्य ठाकरे जिथे जिथे जाणार आहेत, त्या-त्या भागांमध्ये जाऊन राऊत यांनी पाहणी केली. हनुमानगढ, लक्ष्मण किल्ला, शरयूचा घाट इथं जाऊन संजय राऊतांनी आढावा घेतला. तसंच त्यांनी अयोध्येतील साधूसंतांची भेट घेऊन दौऱ्याचं नियोजन केलं. ठिकठिकाणी राऊत यांचं जोरदार स्वागत करण्यात येत होतं. 


शेकडो शिवसैनिक अयोध्येत दाखल
शेकडो शिवसैनिक मुंबईहून उत्तर प्रदेशात दाखल झाले आहे. अनेक शिवसैनिक विमानानं तसंच ट्रेननं अयोध्येला पोहोचले. विमानातून प्रवास करणाऱ्या शिवसैनिकांनी भर विमानात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या जयजयकाराच्या घोषणा विमानात घुमल्या. तर प्रयागराज रेल्वे स्थानकात ट्रेन पोहोचल्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला.