डी गँगच्या कोणत्या माणसाकडून नवनीत राणा यांनी घेतलं होतं ८० लाखांचं कर्ज?
आता ईडी चौकशी करणार का? संजय राऊत यांचा नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दाऊदशी (Dawood) संबंधित युसुफ लकडावालाकडून (Yusuf Lakdawala) राणा यांनी कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यासंदर्भातलं एक ट्विट त्यांनी केलं आहे.
संजय राऊत यांचं ट्विट
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, 'नवनीत राणा यांनी युसुफ लकडावालाकडून 80 लाखांचं कर्ज घेतलं होतं, ज्याचा तुरुंगात मृत्यू झाला, त्याच लकडावालाला मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक करण्यात आलं होतं, त्याचे दाऊद गँगशी संबंध होते' असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, तसंच आता ईडी या प्रकरणाची चौकशी करणार का, हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी कागदपत्रांचा फोटोही शेअर केला आहे.
शिवसेना आक्रमक
या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याबरोबरच ईडीकडे तक्रार करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यामुळे आगामी काळात राणा दाम्पत्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने राणा दाम्पत्याविरोधात थेट भूमिका घेतल्याने सेना विरुद्ध राणा हा संघर्ष आणखी पेटणार आहे.