मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी युतीसाठी शिवसेनेपुढे फार नमते घेणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेना भलतीच आक्रमक झाली आहे. शिवसेना कोणालाही घाबरत नाही, शिवसेनेला इतरजण घाबरतात, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर पलटवार केला. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आम्ही या निर्णयावर अजूनही ठाम आहोत. त्यामुळे इतरांनी आम्हाला धमक्या देऊन नयेत. शिवसेना असल्या धमक्यांना भीक घालत नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूर येथे रविवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी युतीवरून शिवसेनेला इशारा दिला होता. युती होगी तो साथी को जितायेंगे नहीं हुई तो पटक देंगे’. मित्रपक्ष सोबत आला तर त्यांना जिंकवू अन्यथा त्यांचाही पराभवाची धुळ चारु. त्यासाठी प्रत्येक बुथवर तयारी सुरु करा, विजय आपलाच होईल, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी भाजपला २०१४ पेक्षाही मोठा विजय मिळेल, असा दावा केला. भाजप स्वबळावर लढल्यास ४० लोकसभा मतदारसंघात विजय मिळेल, असा दावाही त्यांनी केला होता. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


आम्हाला अहंकार दाखवता, त्यांना गोंजारता; अमित शाहांच्या पवित्र्यामुळे शिवसेना दुखावली