मुंबई : शिवसेना नेत्यांची विधानभवनात बैठक होते आहे. मुंबई विद्यापीठ पेपर तपासणी गोंधळावरून सेनेची अधिवेशनातील भूमिका ठरवण्याबाबत बैठक होणार आहे.


सेना आमदार अनिल परब यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंविरोधात मांडलेल्या हक्कभंगावर भूमिका ठरवण्यासाठी पक्षाची बैठक सुरू आहे. काल परब यांनी मुंबई विद्यापीठात पेपर तपासणीतल्या घोळाबद्दल विनोद तावडेंनी सभागृहात दिलेली तारीख न पाळल्यानं त्यांच्यावर हक्कभंग आणला होता. त्यावर विधानपरिषद सभापतींनी निर्णय राखून ठेवला होता.