मुंबई : छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने उद्या मुंबईत CAA, NRC आणि NPRविरोधी छात्र परिषदेचं आयोजन करण्यात  आले आहे. या परिषदेला उमर खालीद आणि मंत्री आदित्य ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे देशात असंतोषाचं वातावरण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थ्यांनी हाती घेतलंलं आंदोलन आता जनआंदोलन बनत आहे. त्याचाच भाग म्हणून छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या पुढाकाराने या परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे.



या परिषदेला देशभरातून विद्यार्थी येणार आहेत. यात दिल्लीचे छात्र नेते उमर खालीद, पूयीच्या युवा नेत्या रिचा सिंग, अलिगढ विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सलमान इम्तियाज, जेएनयुचे नेता रामा नागा यांच्यासह छात्र भारतीचे राज्य अध्यक्ष प्रा. रविंद्र मेढे उपस्थित राहाणार असून गीतकार जावेद अख्तर, मंत्री आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड, आमदार कपील पाटील, आमदार रोहीत पवार यांना देखील आमंत्रित केलंय. त्यामुळे या छात्र परिषदेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे आणि उमर खालीद एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे.