MLA Disqualification Case : शिवसेना 16 आमदारांचा अपात्रतेचा निकाल जानेवारीत येण्याची शक्यता आहे. यावर्षी आमदारांना कसलाही धोका नाहीये. कारण, आमदार अपात्रतेची अंतिम सुनावणी डिसेंबरमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे निकाल येण्यासाठी जानेवारी उजाडणाराय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी (Rahul Narvekar) आमदार अपात्रता सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केलंय. आमदार अपात्रतेची सुनावणी नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती विधीमंडळातील सूत्रांनी दिलीय. पुढील महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबरपासून युक्तिवाद सुरु होईल.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे अंतिम सुनावणीसाठी डिसेंबर महिन्यात होणार आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीवेळी ठाकरे गटाच्या (Thackeray Group) वतीने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या अशी मागणी करण्यात आली. तर या सर्वांना स्वतंत्र पुरावा द्यायचा असल्याने त्याची वेगवेगळी सुनावणी घ्यावी अशी मागणी शिंदे गटाच्या (Shinde Group) वतीने करण्यात आली होती..त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी वेळापत्रकच जारी केलंय. 


आमदार अपात्रता सुनावणीचं वेळापत्रक कसं असेल पाहुयात...
आमदार अपात्रतेबाबत 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरदरम्यान युक्तिवाद   
23 नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यात अंतिम सुनावणी
सर्व याचिका एकत्रित करण्यावर 13 ऑक्टोबरला सुनावणी
20 ऑक्टोबरला सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल
27 ऑक्टोबरला दोन्हीही गट आपापलं म्हणणं मांडतील


विधानसभा अध्यक्ष परदेश दौऱ्यावर
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एक आठवडा परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. घाना देशात 66वr राष्ट्रकुल संसदीय परिषद होणार आहे.  राहुल नार्वेकर हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह घाना दौऱ्यावर जाणार आहेत.  30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत घाना देशात राष्ट्रकुल संसदीय परिषद होणार आहे. या परिषदेत जगातील विविध देशांमधील संसद आणि विधीमंडळ प्रमुख उपस्थित राहाणार असून जागतिक संसदीय आणि राजकीय प्रश्नांवर या परिषदेमध्ये विचारमंथन होणार आहे. 


ठाकरे-शिंदे गटाचा युक्तीवाद
काल झालेल्या सुनावणीत ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तीवाद केला. दाखल झालेल्या याचिकांचा विषय एकच आहे. त्यामुळं सर्व याचिकांवर एकत्रत सुनावणी घ्यावी असा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी केला. तर याचिका एकत्र घ्यायला शिंदे गटाचा विरोध आहे. सर्व याचिका एकत्र नको वेगवेगळी सुनावणी घ्या असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकिल अनिल साखरे यांनी केला. शिंदे गटाला शेड्युल 10 लागू होत नाही, शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलं आहेय याचिका वेगळ्या असल्या तरी प्रत्येक आमदारांचे वैयक्तिक म्हणणं सविस्तर ऐकून घ्या अस वकील अनिल साखरे यांनी म्हणणं मांडलं.