मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असून घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या पक्षातील आमदार फुटू नयेत याची काळजी सर्वच पक्ष घेत आहेत. भाजपाने २५ ते ५० कोटींची ऑफर देऊन आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेने केली. दरम्यान शिवसेनेने त्यांचे सर्व आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांना पोलीस सुरक्षा मागितली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शिवसेनेचे सर्व आमदार दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत मालाड मढ आय लँड येथील हाँटेल रिट्रीट येथे रहाणार आहेत. त्यामुळे या हाँटेलची आणि शिवसेनेचे सर्व आमदार आणि अपक्ष आमदारांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची विनंती शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांनी पत्राद्वारे मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना केली आहे. याच हाँटेलवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आमदारांना भेटण्यासाठी ही येणार आहेत. त्यामुळे पोलिस सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार आहे.