नारायण राणे-संजय राऊतांमधला वाद `अरे तुरे`वर... राऊत म्हणतात तो XXX माणूस
नारायण राणे म्हणतात पुन्हा जेलवारी घडवणार, तर संजय राऊत म्हणतात मंत्रिपद जातंय म्हणून तो भैसाटला आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद
Maharashra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) आणि ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात जोरदार कलगितुरा रंगलाय. संजय राऊत यांना पुन्हा जेलवारी घडवणार असा सज्जड इशाराच नारायण राणे यांनी दिलाय. तर शिंदे गटाला (Shinde Group) सामावून घेण्यासाठी नारायण राणेंचं मंत्रिपद जाणार असल्यामुळे त्यांची सटकली आहे. आणि त्यातूनच ते असली विधानं करत असल्याचा पलवटवार राऊतांना केलाय.
काय म्हणाले नारायण राणे?
माझ्याकडे कात्रण असून ती मी वकिलांकडे पाठवून ठेवली आहेत, मी वाचून विसरणारा नाही तर दखल घेणारा आहे, माझा वाईट स्वभाव आहे, 26 तारखेचा अग्रलेख मी जपून ठेवला आहे, संजय राऊतला सोडणार नाही, मी पण त्याच्यावर केस टाकणार असा इशाराच नारायण राणे यांनी दिला आहे. संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत नारायण राणे यांनी टीका केला. संजय राऊत शंभर दिवस आतमध्ये राहिला, त्याला वाटतंय आता परत जावं, मी रस्ता मोकळा करतोय परत जायला असं नारायण राणे यांनी म्हटलंय.
संजय राऊत यांचं प्रत्युत्तर
तर नारायण राणे यांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी नारायण राणे यांना चक्क पादरा पावट्याची उपमा दिली. तो पादरा माणूस आहे, आतापर्यंत मी त्याच्याविषयी काही बोललो नाही असं सांगत संजय राऊत यांनीही नारायण राणे यांचा एकेरी उल्लेख केला. हा सर्वांना अरे तुरे करतो, हा कोण आहे, कालपर्यंत एकनाथ शिंदे यांना अरेतुरे करत होता, पंतप्रधान मोदींना अरेतुरे, हे कोण आहेत, याची चौकशी करा, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
हा राऊत विरुद्ध राणे असा वाद नाही, त्याला वेड लागलं आहे, तो वेड्यांच्या कळपात आहे, नारायण राणेची सटकली आहे, मी त्याला कालपर्यंत आदराने उल्लेख करत होतो, जरी तो आमच्यावर टीका करत होता, मी एक शब्द बोललो नाही. कोण आहे हा माणूस, याचं मंत्रिपद जातंय, शिंदे गटाच्या माणसांना सामावून घेण्यासाठी नारायण राणेचं मंत्रिपद जातंय, म्हणून तो भैसाटला आहे, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत यांना कोर्टाचा दणका?
दरम्यान, संजय राऊतांना कोर्टाने दणका दिलाय. शिवडी कोर्टाने संजय राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केलाय. तर आपण हायकोर्टात असल्यामुळे शिवडी कोर्टात पोहचायला उशीर झाला. त्यामुळे पुढच्या सुनावणीस हजर राहणार असल्याचं स्पष्टीकरण राऊतांनी दिलंय.