घोडेबाजार टाळण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीने आमदारांचं हॉटेल बदललं
घोडेबाजार टाळण्यासाठी खबरदारी
मुंबई : सध्याच्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या आमदारांचा घोडेबाजार होऊ नये यासाठी काटेकोर खबरदारी बाळगत आहेत. याचाच भाग म्हणून मुंबईतल्या ललित हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेल्या शिवसेना आमदारांना आता लेमन ट्री हॉटेलमध्ये हलवण्यात येणार आहे. तर राष्ट्रवादीचे रेनेसान्स हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेले आमदार आता ग्रँड हयात हॉटेलमध्ये धाडले जाणार आहेत. तर काँग्रेसचे आमदार हे जेडब्ल्यू मॅरियट या हॉटेलमध्ये आहेत.
भाजपकडून काँग्रेस आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र काँग्रेस आमदार त्यांना बधणार नाहीत असा विश्वास, अशोक चव्हाणांनी व्यक्त केलाय.