मुंबई : नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्पाबाबत अबू धाबी आणि केंद्र सरकारमध्ये गुंतवणूक करार झाला आहे. या कराराला थांबवण्याऐवजी गती देण्याचे काम केंद्राकडून जोरात सुरू आहे. केंद्राने जरी नाणारला मंजुरी देण्यासाठी करार करण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी कोणताही करार होऊ शकणार नाही. तसंच 
महाराष्ट्रात हा प्रकल्प होणार नाही म्हणजे नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. तर हा करार करतांना मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री यांना अंधारात ठेवले. याबाबत निषेध -विरोध हा मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या पुढे नोंदवला आहे. उद्या मुख्यमंत्री-उद्योगमंत्र्या बैठक होणार असून  त्यात याबाबत चर्चा होईल अशी प्रतिक्रीया दिवाकर रावते यांनी दिलीय.