मुंबई : मुंबई विद्यापीठात सुरू असलेल्या निकालाच्या गोंधळावरून शिवसेनेनं शिक्षणमंत्री विनोद तावडेंविरोधात विधानपरिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी तावडेंविरोधात हा हक्कभंगाचा प्रस्ताव मांडलाय. यासंदर्भात तावडेंकडून खुलासा मागवणार असून कागदपत्रे तापसून निर्णय घेणार असल्याचं विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरेंनी स्पष्ट केलं. 


तर सत्ताधारी पक्ष हक्कभंग कसा मांडू शकतो? असा सवाल काँग्रेस नेते नारायण राणेंनी उपस्थित केला.