मुंबई : शेतकरी संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. राज्यभरातून या संपाला उस्त्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आज या संपाचे परिणाम राज्यभर बघायला मिळत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, इकडे शिवसेनेनंही शेतकऱ्यांच्या संपाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. शिवाय शेतक-यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी ज्यांना त्यांच्या समस्या समजतात अशांच्या हाती सूत्र द्यावीत असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.


बाजार समित्यांमध्ये मालाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. नवी मुंबईतल्या बाजारात 146 गाड्यांची आवक झाली आहे. त्यापैकी फक्त 15च गाड्या महाराष्ट्रातल्या आहेत. तर दुसरीकडे पुण्यात दूध संकलनावर मोठा परिणाम झालाय. दूध संकलन 50 टक्क्यांनी कमी झालंय. मुंबईतील दादर मंडईत कांदेपात, टोमॅटोचे ट्रकच आलेले नाहीत. नाशिकमध्ये कालपासून बाजार समित्या मध्ये व्यवहार पूर्णपणे ठप्प झालेले आहेत.  मालाची आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर आपोआपच वाढायला सुरूवात झालीय. नवी मुंबईत घाऊक बाजारात कोथिंबीरीच्या एका जुडीचा भाव 100 रुपयाच्या घरात पोहचला आहे.