शेतक-यांच्या भूमिकेस शिवसेनेचा सदैव पाठिंबा - उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, समृद्धी महामार्ग प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. समृद्धी प्रकल्पग्रस्तांचं पूर्ण समाधान झालं. त्यानंतरच प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी जमीन अधिग्रहणाच्या कागदपत्रांवर सह्या केल्याचं, उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, समृद्धी महामार्ग प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. समृद्धी प्रकल्पग्रस्तांचं पूर्ण समाधान झालं. त्यानंतरच प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी जमीन अधिग्रहणाच्या कागदपत्रांवर सह्या केल्याचं, उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
शिवसेना विकासाच्या विरोधात नाही. मात्र शेतक-यांचं नुकसान होऊ नये, ही शिवसेनेची भूमिका असल्याचं ते म्हणाले. प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, यासाठी शिवसेना आग्रही असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेनेचा सदैव शेतक-यांच्या भूमिकेला पाठिंबा राहिल, अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान आपण पक्षाशी एकनिष्ठ असून, पक्षप्रमुखांच्या आदेशानेच जमीन अधिग्रहण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचं, एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.