मुंबई : शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी वचननामा प्रसिद्ध करण्यापूर्वीच अनेक आश्वासनांची खैरात केली होती. शिवसेना सत्तेवर आल्यानंतर काय करणार हे त्यावेळी सांगितल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठीचा वचननामा उद्या सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर प्रकाशित करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार, दहा रूपयांत थाळी देणार, ३०० युनिटपर्यंतच्या घरगुती वीज वापराचा दर ३० टक्यांनी कमी करणार, एका रूपयांत आरोग्याची चाचणी करणार, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बससेवा देणार आदी या महत्वाच्या घोषणा त्यांनी दसरा मेळाव्यात केल्या होत्या. आता या सोडून आणखी नवी आश्वासने वचननाम्यात काय असणारेत ते पाहणं महत्वाचं आहे. 


वनचनाम्यात या घोषणा होणार?


- ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना.
-  महिला सक्षमीकरणावर भर.
-  कृषी उत्पन आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर विविध योजना.
- उद्योग, व्यापारासाठी विशेष योजना.
- महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा दर्जेदार करण्यासाठी योजना.
-  शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात विशेष योजना.
- शहरांच्या विकासासाठी विशेष योजना.