मुंबई: शिवसैनिकांनी तन-मन-धन अर्पण करुन काम केले तर आगामी काळात महाराष्ट्रात शिवसेनेचे १८० ते २०० आमदार निवडून येतील, असे वक्तव्य खासदार अनिल देसाई यांनी केले. ते शुक्रवारी शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते. यावेळी अनिल देसाई यांनी आगामी काळात शिवसेना राष्ट्रीय स्तरावर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचे संकेत दिले.  शिवसेना बलाढ्य तर राज्य बलाढ्य ही संकल्पना घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. देशाच्या पंतप्रधानपदी शिवसैनिक बसेल, असे काम करुयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत


जर शिवसैनिकांनी तन-मन-धन अर्पण करुन काम केले तर महाराष्ट्रात नक्कीच शिवसेनेचे १८० ते २०० आमदार निवडून येतील, असा विश्वास अनिल देसाई यांनी व्यक्त केला.तत्पूर्वी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही भविष्यात उद्धव ठाकरे यांची राष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा आणखी प्रभावी करण्याचे संकेत दिले. आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहतोय. आता राज्याच्या सीमा ओलांडण्याची वेळ आली आहे. आता देशाचं नेतृत्व करण्याची वेळ आल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. 


मी विचारधारा बदललेली नाही, त्यामुळे हे शिवधनुष्य पेललेले आहे - उद्धव ठाकरे


दरम्यान, भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला होता.