मुंबई : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी आता शिवसेना युवा नेत्य़ांनी आग्रह धरला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून 'माझा आमदार माझा मुख्यमंत्री' असे ट्विट करत त्यांनी आपली मागणी लावून धरली आहे. अमेय घोले, पूर्वेश सरनाईक यांनी ट्विटर वरुन माझा आमदार माझा मुख्यमंत्री अशी मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत असल्याने आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करावं या मागणीसाठी दबाव वाढू लागला आहे. यासाठी आमदारांनी याआधी मातोश्रीवर जावून उद्धव ठाकरेंची भेट घेत आदित्य ठाकरेंनाच मुख्यमंत्री करावं अशी मागणी केली होती. आदित्य ठाकरेंनी यंदा वरळीतून निवडणूक लढवत विजय मिळवला आहे. निवडणूक लढवणारे ते पहिलेच ठाकरे आहेत. शिवसेनेकडून सतत आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं जातं होतं.


भाजप आणि शिवसेनेनं विजयी बंडखोर आणि अपक्षांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे आता दोघांमध्ये बंडखोरांना आपल्याकडे वळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे.


विधानसभा निवडणुकीच्या निकालात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नसल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग कठीण झाला आहे. भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमताचा आकडा नसल्याने त्यांना शिवसेनेला सोबत घेऊनच सत्ता स्थापन करावी लागणार आहे. पण शिवसेना नेते आदित्य़ ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आक्रमक भूमिकेत दिसत आहेत.