शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणी समितीची घोषणा
शिवसेनेच्या आज झालेल्या कार्यकारिणी बैठकीत एकनाथ शिंदे, चंद्रकात खैरे, अनंत गीते, आनंदराव अडसूळ यांच्या नावाची नेतेपदी घोषणा करण्यात आलीय.
मुंबई : शिवसेनेच्या आज झालेल्या कार्यकारिणी बैठकीत एकनाथ शिंदे, चंद्रकात खैरे, अनंत गीते, आनंदराव अडसूळ यांच्या नावाची नेतेपदी घोषणा करण्यात आलीय.
तर मिलिंद नार्वेकर शिवसेनेचे सचिव म्हणून काम पाहतील.
स्वबळाचा ठराव
या बैठकीत स्वबळाचा ठराव मंजूर करण्यात आलाय. आगामी लोकसभा आणि विधानसभा शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याचं ठराव बैठकीत मंजूर करण्यात आलाय.
आदित्य ठाकरेंची नेतेपदी निवड
उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आलीय. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही घोषणा केली. आदित्य ठाकरेंची नेतेपदी घोषणा होताच, शिवसैनिकांनी फटाके फोडत जल्लोष केला...
तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून फेरनिवड करण्यात आलीय. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून फेरनिवड होणं गरजेचं होतं.