शिवशाही उलटून ३१ प्रवासी जखमी
जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने उपजिल्हा रूग्णालयात दाखल केलंय.
मुंबई: शिवशाही बसचे अपघात अजूनही सुरूच आहेत. मुंबई गोवा महामार्गावर लोणेरे गावाजवळ शिवशाही बसचा अपघात झालाय. बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात ३१ प्रवासी जखमी झालेत.
लोणेरे गावाजवळ अपघात
प्राप्त माहितीनुसार, ही बस दापोलीहून पुण्याला चालली होती. लोणेरे गावाजवळ शिवशाही बस रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आली असताना चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला बस उलटली.
जखमींवर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू
दरम्यान, जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने उपजिल्हा रूग्णालयात दाखल केलंय.