VIDEO : अंबानी कुटुंबात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन! Nita आणि Mukesh Ambani पुन्हा होणार आजी - आजोबा
Shloka Mehta Pregnant : नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. अंबानी कुटुंबात (ambani family) लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नीता आणि मुकेश अंबानी पुन्हा एकदा आजी आजोबा होणार आहे.
Shloka Mehta Pregnant Again Video : प्रसिद्ध उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचं घर आनंदाने बहरुन गेलं आहे. पहिले लाडकी लेक ईशा अंबानीला (Isha Ambani) जुळी मुलं (Isha Ambani Twins) झाली. त्यानंतर लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani Radhika Merchant) यांचा साखरपुडा...आता या अंबानी कुटुंबात लवकरच नवीन पाहुण्याचं आगमन होणार आहे. नीता आणि मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा आजी आजोबा होणार आहेत.
लवकरच नवीन पाहुण्याचं आगमन!
नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांची मोठी सून आणि आकाश अंबानी (Akash Ambani Shloka Mehta) यांची पत्नी श्लोका मेहता दुसऱ्यांदा आई होणार आहे. मुंबईत रंगलेल्या NMACC उद्घाटन सोहळ्याचा वेळी मीडिया समोर श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांनी पोज देताना सुंदर साडीमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट (Shloka Mehta Baby Bump) करताना दिसली. कल्चरल सेंटर (एनएमएसीसी) चा भव्य शुभारंभ 31 मार्चला मुंबईत पार पडला. अंबानी कुटुंबाच्या या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. (Mukesh Ambani Nita Ambani)
अंबानी कुटुंबात प्रत्येक गोष्टी आणि आनंदाचं भव्यदिव्य स्वागत केलं जातं. या नवीन पाहुण्याचा आगमानासाठीही ते काही कमी होऊ देणार नाही.
हेसुद्धा वाचा - NMACC Launch: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची धमाकेदार सुरुवात; बॉलिवूडसह राजकीय नेत्यांची मांदियाळी, पाहा VIDEO
त्यामुळे यावेळी ते नवीन पाहुण्याचा आगमनासाठी काय काय करतात हे पाहण्यासाठी सर्वसामान्य जनता उत्सुक आहेत.