मुंबई : Mahindra&Mahindra चे चेअरमन आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर खास करून Twitter फार ऍक्टिव असतात. आनंद महिंद्राच्या यांच्या Tweets मुळे त्यांचे फॅन फॉलोइंग देखील भरपूर आहेत. आनंद महिंद्रा आपल्या हजरजबाबी स्वभावामुळे कायमच चर्चेत असतात. पण यावेळी मात्र आनंद महिंद्रा यांची बोलती बंद झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोन प्रकारचे फेस मास्क दाखवले आहेत. एका मास्कवर लिहिलंय 'लडके वाले' तर दुसऱ्या मास्क वर लिहिलंय 'लडकी वाले'



हे फोटो शेअर करून आनंद महिंद्रा लिहितात की,'मला माहित नाही हे बघून मी खुश होऊ की घाबरू. खरंच या मास्कने माझी बोलती बंद केली आहे.' या मास्कवरून आपण अंदाज लावू शकतो की, लग्न सोहळ्यात कशा पद्धतीने मास्क डिझाइन केले जातात. वधु आणि वर पक्षाची मंडळी ही मास्क घालणार आहेत. कोरोनाच्या काळात लग्न सोहळे होत आहेत. पण त्यातही योग्य ती काळजी घेऊन कार्यक्रम पार पडले जात आहेत. आनंद महिंद्रा यांच्या ट्विटवर अगदी मजेशीर कमेंट्स केले जात आहेत. काहींनी लग्नात सॅनिटाइझर वाटत असल्याचं देखील सांगितलं आहे.


आनंद महिंद्रा कायमच आपल्या ट्विट्समुळे चर्चेत असतात. असंच हे ट्विट सध्या व्हायरल होत आहे.