Maharashtra News: बुधवारी मुंबईजवळ एक धक्कादायक घटना घडली. ठाणे जिल्ह्यातील कल्याण स्टेशनवर ( Kalyan Railway Station ) डेटोनेटर असल्याची माहिती मिळाली. कल्याण रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मवर डिटोनेटर्स असल्याची माहिती मिळताच उपस्थित प्रवाशांना धक्काच बसला. बुधवारी प्लॅटफॉर्मवर पडलेल्या दोन बेवारस बॉक्समध्ये हा डिटोनेटर असल्याची माहिती मिळाली. यावेळी बॉक्समधून 50 हून अधिक डिटोनेटर्स जप्त करण्यात आले. माहिती मिळताच शासकीय रेल्वे पोलिस (जीआरपी) पथक दाखल झाले. फलाटावर हे डिटोनेटर आढळून आल्याने प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जीआरपीला मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर खोके पडून पडलेले दिसून आले. या घटनेनंतर स्निफर डॉग आणि बॉम्ब निकामी पथक कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. 


यासंदर्भात माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितलं की, कल्याण स्थानकात सहसा गर्दी असते. बेवारस बॉक्सची माहिती मिळाल्यावर, बॉम्ब निकामी पथकाने बॉक्स ताब्यात घेतले. यानंतर यांची तपासणी केले गेली. या बॉक्समधून 54 डिटोनेटर्स जप्त करण्यात आलेत.


या प्रकरणी तपासणी सुरु


जीआरपीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कल्याण जीआरपीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, जप्तीप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. ठाणे शहर पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी डेटोनेटर्सचे बॉक्स सापडले तिथे भेट दिलीये. 


डेटोनेटरचा वापर कशासाठी केला जातो?


ठाणे जिल्ह्यातील तलावांमध्ये बेकायदेशीर मासेमारी करण्यासाठी तसंच खाणींमध्ये ब्लास्टिंगसाठी डेटोनेटर्सचा वापर केला जातो. 2008 च्या मुंबई हल्ल्याच्या वेळीही दहशतवाद्यांनी रेल्वे स्टेशनवर गोळीबार केला होता. या घटनेनंतर रेल्वे स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांकडूनही विशेष खबरदारी घेतली जातेय. अशातच ही घटना घडल्याने यंत्रणा मात्र अलर्ट मोडवर आहे.