नवी दिल्ली  : धावत्या रेल्वेत एक धक्कादायक घटना घडली. रेल्वेत एका विद्यार्थीनीची जवान छेडछाड काढत होता. मात्र, प्रसंगसावधान बाळगून या मुलीने टॉयलेटमध्ये लपून आपली इज्जत वाचविली. देशभरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांना त्रास देणाऱ्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही. कालच्या एका ताज्या घटनेत, एका विद्यार्थीनीची छेडछाड काढण्याचा प्रयत्न झाला. एक फार्मसीची विद्यार्थीनी पुणे ते दिल्ली असा दुरंतो एक्स्प्रेसने प्रवास करत होती. त्यावेळी एका जवानाने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. कोटा येथे रेल्वे आली असता हा प्रकार घडला. लष्करातील सुभेदार संजय कुमार यांने मुलीची छेडछाड काढल्याचे पुढे  आलेय. संजय कुमार याने आधी या मुलीचा हात पकडला. मुलीला वाटले आधी चुकून हात लागला असेल. मात्र, त्यानंतर त्यांनी संधी साधून  वारंवार मुलीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.  


शौचालयातून केला घरी फोन


पीडित मुलीने एका महिलेची मदत मागितली. मात्र, तिच्या मदतीला कोणीही आले नाही. ज्यावेळी या मुलीने पोलिसांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गाडीमध्ये कोणही गार्ड उपस्थित नव्हता. जवानाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी मुलीने बाथरुमचा आसरा घेतला. शौचालयातून तिने घरी फोन केला आणि कुटुंबीयांना झालेला प्रकार सांगितला.


दीड तासानंतर टीसी डब्यात पोहोचला


दरम्यान, मुलीच्या माहितीनंतर कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांकडून काहीही हालचाली  झाल्या नाहीत. तब्बल दीड तासानंतर रेल्वे डब्ब्यात टीसी पोहोचला. त्यानंतर टीसीला त्या मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्या मुलीला दुसऱ्या डब्यात शिफ्ट करण्यात आले.


जवानाला घेतले ताब्यात


छेडछाड काढणाऱ्या जवानाबाबत सकाळी ७ वाजता निजामुद्दीन येथे पोहोचल्यानंतर पीडित मुलीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतला.