मुंबई : अभिनेता शाहरुख खानच मुलगा आर्यन खानचं ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाल्याचा धक्कादायक खुलासा करणारा व्हिडीओ समोर आला आहे. के.पी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने हा व्हिडीओ व्हायरल करून प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाली होती आणि त्यातले 8 कोटी वानखेडेंना दिले जाणार होते असा गंभीर आरोप प्रभाकर साईलने केला आहे. केपी गोसावीच्या सांगण्यावरून साईलने 50 लाख रुपये कलेक्ट केल्याचा खुलासा केलाय आहे या 50 लाखांतले 38 लाख रुपये सॅम डीसोझाला दिल्याचा दावा देखील व्हिडिओमध्ये केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


एवढंच नाही तर क्रुझवरील छापेमारीनंतर शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी, के पी गोसावी आणि सॅम डीसोझा यांच्यात  निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये 15 मिनिटं चर्चा झाल्याचा दावा प्रभाकरने केला आहे. पण हे सर्व आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळले आहेत. या प्रकरणी वानखेडे परिपत्रक जारी करणार आहेत.


25 कोटींची डील झाल्याचं स्पष्टीकरण
प्रभाकर साईलने या प्रकरणात अनेकांची नावे घेतली. ते पुढे म्हणाले, 'छापेमारीनंतर काही वेळाने एक निळ्या रंगाची मर्सिडीज कार आली ज्यातून पूजा ददलानी खाली उतरते. पूजा ददलानी, सॅम डिसूझा आणि गोसावी मर्सिडीज कारमध्ये बसून बोलू लागले. 15 मिनिटांनंतर सगळे निघून गेले. यानंतर, गोसावी आणि मी मंत्रालया जवळ पोहोचले. गोसावी कोणाशी तरी बोलत होते. त्यानंतर ते वाशीला निघून जातात.


पुढे प्रभाकरने सांगितलं की, 'वाशीहून त्यांनी मला पुन्हा ताडदेव जाण्यास सांगितलं. त्याठिकाणाहून त्यांनी मला 50 लाख रूपये आणायला सांगितलं. त्या पैशांनी भरलेल्या दोन बॅग घेवून मी वाशीला येतो आणि गोसावीला देतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा गोसावीने मला बोलावले आणि ते पैसे सॅम डिसूझाला देण्यास सांगितले. संध्याकाळी 6.15 वाजता सॅम डिसूझाने मला हॉटेल ट्रायडंटला बोलावले जेथे मी त्याला पैशांनी भरलेल्या बॅग दिल्या.'


सध्या गोसावी फरार असून माझ्या जीवाला धोका असल्याचं देखील प्रभाकरने सांगितलं आहे. दरम्यान 2 ऑक्टोबरपासून आर्यन तुरुंगात आहे. 26 ऑक्टोबरला आर्यनच्या जामीन अर्जावर सुरूवात होणार आहे. आता या प्रकरणी काय होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.