...तोपर्यंत मुंबईतली दुकाने बंदच राहणार
मुंबई शहरातील दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे
मुंबई : कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने काही दुकाने करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. दरम्यान, मुंबई शहरातील दुकाने बंद राहण्याची शक्यताआहे. राज्य सरकारचे आदेश मिळेपर्यंत मुंबईतली दुकानं बंदच राहणार, अशी भूमिका रिटेल ट्रेडर्स असोशिएशनने घेतली आहे.
राज्य सरकारचे आदेश मिळत नाहीत तोवर मुंबईसह राज्यातली दुकानं बंदच राहतील असे रिटेल ट्रेडर्स असोशिएशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अत्यावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने खुली करण्याचे केंद्रीय गृहखात्याने आदेश दिले होते. त्यावर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे राज्यातली दुकाने आदेश येत नाहीत तोवर सुरु होणार नाहीत, अशी भूमिका रिटेल ट्रेडर्स असोशिएशनने घेतली आहे.
दरम्यान, ३० दिवसांच्या लॉकडाऊननंतर आज केंद्रीय गृहखात्याच्या आदेशाने दुकाने उघडी होत असली तरी दारूची दुकाने खुली होणार नाहीत, असे केंद्रीय गृहखात्याने स्पष्ट केले आहे. ग्रामीण भागातली सर्व प्रकारची दुकाने आजपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर शहरी भागात मॉल वगळता सर्व दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली
आहे.
आत्तापर्यंत लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने खुली होती. मात्र आता इतर दुकानंही खुली करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मात्र मॉल्स आणि मल्टीब्रँड्स अजूनही बंदच राहणार आहेत. मात्र ही अन्य दुकाने सुरू करण्यासाठी केंद्राने कठोर नियम लागू केले आहेत.