मुंबई : गणेशभक्तांना आपल्या लाडक्या सिद्धिविनायक गणपतीचे घरबसल्या दर्शन घेता येणार आहे. सिद्धिविनायक ट्रस्टने ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. तसेच आपण सिद्धिविनायक गपणतीची पूजाही करु शकता. यासाठी आपल्याला वेळ घ्यावी लागणार आहे. त्यासाठी सिद्धिविनायक गपणती अॅपचा वापर करावा लागणार आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर तु्म्हाला दररोज गणपतीचे दर्शन घेता येऊ शकते, अशी सुविधा करण्यात आली आहे. तसेच तुम्ही सिद्धिविनायकाची पूजाही करु शकता. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या ‘सिद्धिविनायक टेंपल’ या मोबाईल ॲपचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपद्वारे भाविकांना घरबसल्या बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे.


या कार्यक्रमाला सिद्धिविनायक गणपती न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, कोषाध्यक्ष सुमंत घैसास, विश्वस्त भरत पारीख, महेश मुदलियार, आनंद राव, गोपाळ दळवी, संजय सावंत, विशाखा राऊत, ॲड. पंकज गोरे, सुबोध आचार्य, वैभवी चव्हाण, न्यासाच्या कार्यकारी अधिकारी प्रियंका छापवाले आदी मान्यवर उपस्थित होते.


कोरोना काळात मंदिरे बंद असल्याने भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येत नव्हते. भाविकांच्या सोयीसाठी न्यासातर्फे ही विशेष सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ‘सिद्धिविनायक टेंपल’ या नावाने असणारे हे ॲप अँड्रॉईड आणि ॲपलवरुन डाऊनलोड करता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून भाविकांना ऑनलाईन दर्शनाची वेळ बुक करता येणार आहे. या बुक केलेल्या वेळी भाविकांच्या नावे मंदिराचे पुजारी थेट गाभाऱ्यातून आशीर्वचन करतील. तसेच ॲपद्वारे भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार असून मंदिरातील विविध सण- उत्सवांची अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे.



 असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या मुंबईतील प्रभादेवी परिसरात असणाऱ्या श्री सिद्धिविनायक मंदिरात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणरायाची आरती करण्यात आली. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने या क्षणांचा एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाला सुरेख अशा चाफ्याच्या सुवासिक फुलांचा साज चढवल्याचं पाहायला मिळला. चाफ्याची कंठी आणि विलोभनीय असं गणरायाचं रुप  सगळ्यांना पाहता आले. आता अॅपचे लोकापर्ण झाल्याने सगळ्यांना दर्शन घेता येणार आहे.