मुंबई : थंड डोक्याने आपल्या आईची हत्या करणा-या सिद्धांत गणोरेला अखेर मुंबई पोलीसांची कोठडी मिळालीये. काल जोधपुर येथे पोलिसांनी सिद्धांत गणोरेला अटक करुन मुंबई पोलीसांच्या स्वाधीन केले आणि आज मुंबई पोलिसांनी सिद्धांतला मुंबईतील बांद्रा न्यायालयात हजर केले असता सिद्धांत गणोरेला २ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावलीये. सिद्धांतने आपल्या जन्मदात्या आईची हत्या का केली? या प्रश्नाचे उत्तर मात्र अजूनही मिळाले नाहीये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धांतला जोधपूरमधून गुरूवारी अटक करण्यात आलीय. आपल्या कृत्याचा काहीही पश्चात्ताप झाल्याची भावना सिद्धांतची चेहऱ्यावर नव्हती. न्यायालयात त्याला न्यायाधिशांसमोर हजर केलं तेव्हाही त्याने बुरखा काढल्यावर विस्कटलेले केस ऐटबाजपणे मागे केले. सरकारी वकील त्याच्या कृत्याचा पाढा वाचत असतानाही त्याचा चेहरा निर्विकार होता. त्याला २ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 


सरकारी वकीलांनी न्यायालयात केलेल्या युक्तीवादावरून सिद्धांतने त्याच्या आईची केलेली हत्या कट रचून केल्याचं स्पष्ट झालंय. पण यात फक्त सिद्धांतचाच हात आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. 


सिद्धांत हा थंड डोक्याचा खुनी आहे. त्याने आईची हत्या केली. ८ ते ९ वेळा चाकू भोसकून त्याने हत्या केलीय. हत्येनंतर आईच्याच रक्ताने मेसेज लिहून खाली स्माईली ही काढला. सिद्धांतने हत्येचा कट रचला, पण या कटात सिद्धांत एकटाच आहे का याबाबत संभ्रम आहे. सराईत गुन्हेगारासारखं त्याचं वर्तन आहे. पण हत्येमागचं कारण नक्कीच धक्कादायक असणार असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी सुनावणी दरम्यान केलाय. 


जोधपूर पोलिसांच्या कृपेने अवघ्या २४ तासात सिद्धांत गणोरे मुंबई पोलिसांना मिळाला. त्यानंतर हत्येचा उलगडा झाल्याचं पोलीस म्हणत आहेत. पण सिद्धांतचा ताबा मिळून १२ तास उलटले तरी हत्येमागचं कारण ते शोधू शकलेले नाहीत त्यामुळे इथे प्रश्नचिन्हं उपस्थित होतंय.