दीपक भातुसे / मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत आज काँग्रेसने या प्रकरणी SIT चौकशीची मागणी केली. शरद पवार यांनी आधीच भीमा कोरेगाव प्रकरणातSIT चौकशीची आग्रही भूमिका घेतली होती. दरम्यान, एका आठवड्याच्या आत याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नितीन राऊत चर्चा करतील आणि पुढची भूमिका ठरवतील, असे यावेळी ठरल्याचे समजते आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 भीमा कोरेगावबाबत गेले अनेक आम्ही अस्वस्थ आहोत, नक्षलवादाच्या नावाखाली अटक केली जाते, हे योग्य नाही.  आम्ही आज या प्रकरणाचा आढावा घेतला आहे.  याची चौकशी NIA करते आहे, पण राज्य सरकारलाही काही अधिकार आहेत. त्या अनुषंगाने काय करता येईल याबाबत तज्ज्ञांचे मत घेत आहोत. आम्हाला वाटतं हा तपास योग्य दिशेने सुरू नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी यावेळी दिली. 


दरम्यान, मराठा आरक्षणावर पवार म्हणाले.  माझी मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत बैठक झालेली नाही.  याविषयावर लवकरात लवकर तोडगा काढावा ही राज्य सरकारची इच्छा आहे. तर कंगना बिल्डिंग आरोप प्रकरणी (हसत) माझी पण इच्छा आहे माझ्या नावावर अशी कोणी बिल्डिंग करावी. अर्थात जे कोणी बोलत आहे, त्या व्यक्तीकडून जबाबदारीने बोलण्याची अपेक्षा धरावी का? हा प्रश्न आहे, असे पवार म्हणाले.