मुंबई : सह्याद्री अतिथीगृहात मुख्य सभागृहाच्या बाहेरील मोठे झुंबर पीओपी स्लँबसह कोसळले. आज संध्याकाळी ४.४५ वाजता सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका सह्याद्री अतिथीगृहात घेत होते. त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरच शोभेचे मोठे झुंबर त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानक झालेल्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. संध्याकाळी ४.४५ वाजता ही घटना घडली. दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही  मात्र दुर्घटना जीवघेणी होती. त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.


'२०-२५ वर्षापूर्वीची इमारत आहे. स्ट्रक्चरल ऑडिट केेले आहे. त्यात काही धोकादायक असं काही आलेले नव्हते. परंतु हे झुंबर कसं कोसळले यासंदर्भातील माहिती माझा विभाग घेत आहे. दुरूस्तीचे आदेश दिले आहेत.' अशी माहिती मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.