देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई : वाहन उद्योगाबरोबरच बांधकाम व्यवसायावरही मंदीचं सावट आहे. मागणीच नसल्यामुळे मुंबई आणि उपनगरांमधली अनेक तयार घरं पडून आहेत. उद्योजकांनी भाव पाडले, तरीही विक्री होत नाही अशी स्थिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटबंदी, रेरा, जी एस टी, भांडवलाचा आटलेला स्त्रोत, बँकेतर संस्थांनी बंद केलेला वित्तपुरवठा, विक्रीमध्ये झालेली घट या आणि अश्या असंख्य कारणांमुळे रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प यामुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत आहे. मुंबई आणि एम एम आर क्षेत्रामध्ये सव्वा दोन लाख घर पडून आहेत. त्यातच मंदीच सावट यामुळे बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणीत भर पडतेय.


बांधकाम व्यावसायिकांना नवं कर्ज मिळणं जवळजवळ बंद झालंय. मंजूर झालेल्या कर्जाचं वितरण होण्यातही विलंब होत असल्याचं बांधकाम व्यवसायिकांच म्हणणं आहे. नव्या गृह प्रकल्पांना परवानगीचा कालावधी कमी करण्याची घोषणा प्रत्यक्षात अंमलात आलेलीच नाही. या सर्वांचा व्यवसायावर परिणाम झालाय आणि किंमती कमी कराव्या लागल्या आहेत.



वाहन क्षेत्रापाठोपाठ बांधकाम व्यवसायही मंदीच्या फेऱ्यात अडकत चालल्याचं दिसतंय. दीर्घ मुदतीच्या कर्जांची मागणी असलेली ही दोन्ही क्षेत्रं आहेत. त्यामुळेच या क्षेत्रांमधील मंदीचा सरकारनं गांभिर्यानं विचार करायला हवा.