COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : आज मुंबईतल्या लोकलमध्ये सापडलेला साप हा लोकलमध्ये आला होता की कुणीतरी खोडसाळपणा करत सोडला होता, याचा तपास रेल्वे करतंय.. आज सकाळी टिटवाळ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या ८.३३ च्या लोकलमध्ये हरणटोळ नावाचा साप सापडला होता. पंख्यावर हा साप होता.... त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाला होतं.  मात्र हा साप आला की आणला याचा आता रेल्वे पोलीस  तपास करतायत.  कारण या लोकलनं याआधी दोन फेऱ्या पूर्ण केल्या होत्या.  त्यामुळे लोकलमधला हा साप म्हणजे खोडसाळपणा आहे, का याचा तपास पोलीस गांभीर्यानं करतायत.


सीसीटीव्ही तपासणार 


या गाडीच्या ३ फेऱ्या झाल्या होत्या. जर कारशेडमधून आला असता तर सकाळीच आला असता असे अनेकांचे म्हणणे आहे. रेल्वे पोलीस याप्रकरणी सीसीटीव्ही आणि सर्पमित्रांकडे चौकशी करत आहेत.