मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या आरोपानंतर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. मात्र, या नोटीसवरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु केलंय. भाजपचे महत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगला येथे जमा झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संदर्भात प्रतिक्रिया देताना भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्यसरकावर जोरदार टीका केलीय. आघाडी सरकार घाबरलं आहे. फडणवीस साहेबांनी सभागृहात सगळे विषय पुराव्यानिशी मांडले. त्यावर सरकारने अजून रिप्लाय दिलेला नाही. अशावेळी ज्या पद्धतीने या सगळ्या कारवाई सुरु आहे. मुंबईत छावणीचे स्वरूप दिसत आहे.


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आधी पोलिसांनी स्टेटमेंट घ्यायला बोलावलं आणि आता ते घरी जाऊन स्टेटमेंट घेणार आहेत. राज्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे काम सरकार करत आहे. सरकारला वातावरण बिघडवायचे आहे का? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आहे का? असा सवाल त्यांनी केला.


 



ज्या पद्धतीने अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला गेला. पण, दहशतवादी, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद याला मदत करणाऱ्याचा नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नाही? हे सरकार दाऊदचे सरकार आहे का? असे असेल तर मंत्र्यांनी आपल्या दालनातील गांधीजींचे फोटो काढावेत आणि दाऊदचे फोटो लावावेत. त्याच्या फोटोसमोर नतमस्तक व्हावे. महाराष्ट्रात त्याचे ठिकठिकाणी स्मारक बांधा. वाटल्यास त्याला महाराष्ट्रभूषणही देऊन टाका, अशी जोरदार टीका त्यांनी केली.