सोमय्या बाप- बेटे 100 टक्के जेलमध्ये जाणार - संजय राऊत
Sanjay Raut PC On Kirit Somaiya Scam : मी तुम्हाला काय सांगितले. भाजपचे साडेतीन नेते जेलमध्ये जाणार आहेत. तुमची अपेक्षा होती की मी ती नावे काल सांगेन. जसे जसे ते आतमध्ये जातील, तसे तसे तुम्ही मोजत जा, असे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी नावांबाबतचे गूढ कायम ठेवले आहे.
मुंबई : Sanjay Raut PC On Kirit Somaiya Scam : मी तुम्हाला काय सांगितले. भाजपचे साडेतीन नेते जेलमध्ये जाणार आहेत. तुमची अपेक्षा होती की मी ती नावे काल सांगेन. जसे जसे ते आतमध्ये जातील, तसे तसे तुम्ही मोजत जा, असे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी नावांबाबतचे गूढ कायम ठेवले आहे.मात्र, सोमय्या बाप-बेटे 100 टक्के जेलमध्ये जात आहेत. दुसऱ्याला जेलमध्ये घालवायचे धमक्या देतात, आता तुम्ही जा, असे थेट आव्हान राऊत यांनी दिले. (Somaiya father and son will go to jail 100 percent - Sanjay Raut)
किरीट सोमय्या यांनी ED अधिकाऱ्याला 15 कोटी रुपये दिले - राऊत
क्रिमिनल सिंडिकेट, ईडी यांच्या नावाने धमक्या या सगळ्याचा आता भांडाफोड होईल. मी तुम्हाला बोललो 19 बंगले दाखवा, दाखवले का ? मुंबईत बिल्डर व्यापारी यांच्याकडून ईडीच्या नावाने धमक्या देऊन या किरीट सोमय्याने आतापर्यंत शेकडो कोटी रुपये गोळा केले आहेत. त्यातील 15 कोटी ईडीच्या अधिकाऱ्याला दिले आहेत, असा आरोप राऊत यांनी यावेळी केला.
8 जेव्हीपीडी स्कीम, सुजीत नवाब नावाचा एक प्लॉट आहे. हा प्लॉट किरीट सोमय्या आणि त्याचा मित्र बिल्डर अमित देसाई या दोघांनी मूळ मालकाला ईडीची धमकी देऊन शंभर कोटी रुपयांचा प्लॉट मातीमोल भावाने अमित देसाई याच्या नावाने करून घेतला आहे. ईडीची धमकी देऊन हा प्लॉट आपल्या नावे करून घेतला आहे आणि त्यातले पंधरा कोटी रुपये किरीट सोमय्या यांनी कोणत्या ईडी अधिकाऱ्याला नेऊन दिले हे ईडीने स्पष्ट करावे. नाहीतर मी त्या अधिकाऱ्याचं नाव घेईल, असा गंभीर इशारा राऊत यांनी दिला आहे.
किरीट सोमय्या हा इन्वेस्टगेटिव्ह अथॉरिटी नाही. भाजपने सांगावं किरीट सोमय्या हा जबाबदार माणूस आहे आणि त्याच्या आरोपाची आम्ही सहमत आहोत. मला कागद वगैरे काही सांगू नका, बंगले आहेत की नाही हे सांगा ?
मी आव्हान दिले ना, एकोणीस बंगले कुठे आहेत ते दाखवा, देवस्थानच्या जमिनी कुठे आहेत? एक दूधवाला महाराष्ट्र येतो या ठिकाणच्या सरकारमधील काही नेत्यांचे पैसे आपले धंद्यात गुंतवतो आणि सात हजार कोटींचा मालक होतो. माझा प्रश्न आहे अमोल काळे कुठे आहे, नाहीतर आम्ही समोर आणू अमोल काळे सोबत व्यवहार काय झाले ते? सुरुवात त्यांनी केली आहे, शेवट आम्ही करणार, असे राऊत म्हणाले.