कल्याण : अंगामध्ये भूत असल्याच्या संशयावरून मायलेकाचा नरबळी दिल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याणच्या अटाळी भागात अघोरी विद्येमुळे मायलेकाचा नरबळी देण्यात आळा आहे. दुहेरी नरबळी दिल्यामुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंगात भूत असल्याच्या संशयावरून ५० वर्षांचे पंढरीनाथ तरे आणि त्यांच्या ७६ वर्षांच्या आई चंदूबाई तरे यांचा नरबळी घेण्यात आला. नातेवाईक आणि मुलाने पंढरीनाथ आणि चंदूबाई यांना दिवसभर हळद टाकून दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कल्याण खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चारही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातला सुरेंद्र पाटील हा मांत्रिक आहे.