मुंबई : मध्य रेल्वेवर परळ, करी रोड येथील नवीन पादचारी पुलांच्या गर्डरच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेवर आज विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते दादरपर्यंत लोकल सेवा सहा ते आठ तासांपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे दादरहून सीएसएमटीकडे जाण्यासाठी वाहतुकीचे अन्य पर्याय निवडावेत, असे आवाहन रेल्वेने केले आहे. परळ आणि करी रोड स्थानकातील पादचारी पूल लष्करातर्फे बांधण्याचे काम सुरू आहे.


या पुलांचे गर्डर टाकण्यासाठी घेण्यात येणाऱ्या विशेष ब्लॉकमुळे सीएसएमटी ते दादरदरम्यानची लोकल वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल दादर आणि कुर्ला स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहेत. तिथूनच त्या पुन्हा ठाणे, कल्याणच्या दिशेने सोडण्यात येतील. दादर, कुर्ला आणि ठाण्यातून सुटणाऱ्या आणि या स्थानकासाठी शेवटचा थांबा असणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कायम राहणार आहे. 


म्हणून रात्री ऐवजी रविवारचा दिवस


गर्डर उभारताना संपूर्ण मार्गावरील विद्युतपुरवठा खंडीत करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे सावधगिरी बाळगत सहा ते आठ तासांपुरता हा प्रवाह खंडीत करण्यात येणार आहे. ही कामे रात्री करणे कठीण असल्याने रविवारचा दिवस निवडण्यात आलाय.


अशी वाहतूक सुरु राहणार


सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल दादर आणि कुर्ला स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहे. तिथूनच त्या पुन्हा ठाणे, कल्याणच्या दिशेने सोडण्यात येतील. दादर, कुर्ला आणि ठाण्यातून सुटणाऱ्या आणि या स्थानकासाठी शेवटचा थांबा असणाऱ्या लोकलचे वेळापत्रक कायम राहणार आहे.


बस, टॅक्सीला प्राधान्य द्या


दादरहून सीएसएमटीकडे जाण्यासाठी वाहतुकीचे अन्य पर्याय निवडावेत, असे आवाहन रेल्वेने केले आहे. त्यासाठी प्रवाशांना दादरहून पश्चिम रेल्वेने किंवा बस, टॅक्सीचा पर्याय स्वीकारावा लागेल. 


ब्लॉकनंतरचे वेळापत्रक 


- दादरहून धीम्या मार्गासाठी पहिली लोकल दु. ३.३५ वा. 


- दादरहून जलद मार्गासाठी पहिली लोकल दु. ४.३८ वा. 


- सीएसएमटीहून जलद मार्गासाठी पहिली लोकल दु. ३.४० वा. 


- सीएसएमटीहून स्लो मार्गासाठी पहिली लोकल दु. ३.५० वा. 


रद्द करण्यात आलेल्या मेल-एक्स्प्रेस 


- सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी सिंहगड 


- सीएसएमटी-मनमाड-सीएसएमटी राज्यराणी 


- सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन 


- सीएसएमटी-मनमाड-सीएसएमटी पंचवटी 


- सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस 


- सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस 


- सीएसएमटी-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस