नेहा सिंग,झी मिडिया,मुंबई :  यंदाच्या दिवाळीत तुमचं वजन वाढणार नाही याची पुरेपुर काळजी मिठाई विक्रेत्यांनी घेतली आहे. मिठाई विक्रेत्यांनी ग्राहकांची मागणी आणि गरज लक्षात घेऊन, मार्केटमध्ये फ्रूट मिठाईचा पर्याय आणला आहे...चला तर, पाहूया फ्रूट मिठाईचा हटके पर्याय....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणताही सणवार म्हटंला की, गोडधोड हे आलंच त्यात दिवाळीत तर फराळासोबत आकर्षक आकारातील,रंगातील मिठाई पाहून...तोंडाला पाणी सुटलं नाही तर नवलच....मात्र, ही मिठाई खाल्यावर सगळ्यात जास्त टेन्शन येतं ते, वजन वाढण्याचं...पण, कॅलरी वाढण्याचीही काळजी करण्याची गरज नाही, कारण मार्केटमध्ये तसे पर्याय उपलब्ध आहेत. अगदी याचा आस्वाद डायबिटीज् पेशंटही घेऊ शकतात. विशेष म्हणजे, तीन महिन्यापर्यंत या पदार्थाची चव जशीच्या तशी रहावी आणि तो जिन्नस खराब होऊ नये यासाठी खास पॅकिंग केलं जातं. यात, कमी कॅलरीजचे वेफर्स आणि बिस्किटांचा समावेश आहे.


कमी कॅलरीज असलेल्या जिन्नासांना  ग्राहकांचीही पसंती मिळत आहे. यात, खास करून ड्राइड अमेरिकन प्लम,येलो लेमन,किवी आणि जॅकफ्रूट अर्थात फणासाची खास व्हरायटी मिळत आहे. याव्यतिरिक्त, खजूर,मोसंबी,पीच,अननसाच्या फोडी हे देखील तुम्ही पाहुण्यांना दिवाळी भेट म्हणून घेऊ जाऊ शकतात. या खास मिठाईचे दर 700रूपये किलोपासून 1200 किलोपर्यंत आहेत.


यंदाच्या दिवाळीत, अन्य मिठाईप्रमाणेच शुगर फ्री आणि स्टेविआ वापरून हटके असे जिन्नस ग्राहकांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे, यंदाची ही दिवाळी अधिक हेल्दी होईल हे नक्की..