मुंबई :  गुरुग्राममधील विद्यार्थ्याच्या हत्येने खळबळ माजली आहे. मुंबईतही विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण चिंताजनकच आहे. याच पार्श्वभूमीवर यंत्रणेच्या हालचालींना वेग आला असून शाळांमधील संवेदनशील जागांवर ‘स्पेशल स्कॉड’चा वॉच ठेवण्यात येणार आहे. मुलांच्या संरक्षणासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे बोलले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही समुपदेशनही करण्यात येणार आहे. शाळेतील परिवहन समितीच्या कक्षा वाढवून ‘सुरक्षा व परिवहन’ समितीत रूपांतर करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक संघटनेने जाहीर केले आहे.


विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ९० टक्के शाळांमध्ये सीसीटीव्ही आहेत. पण तरीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शाळेत ‘विशेष पथक’ तयार होणार आहे.  हे पथक अडगळीच्या जागा, चेंजिंग रूम, बाथरूम अशा ठिकाणी ठराविक वेळाने नियमित पाहणी करणार आहे. याबाबत लककरच राज्य मुख्याध्यापक संघटनेची बैठक बोलविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  जिल्हानिहाय बैठकांचे आयोजन करून संबंधितांना सूचना देण्यात येणार आहे.


विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. या पार्श्वमूमीवर लवकरच मुख्याध्यापक संघटना ‘ऍक्शन प्लान’ तयार होणार आहे. याच्या अंमलबजावणीचे आवाहन मुख्याध्यापकांना करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी सांगितले.



 टप्प्यांत कार्यवाही


– शाळांमधील संवेदनशील क्षेत्रे जाहीर करणार
– क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षकांचे विशेष लक्ष