मुंबई : स्पाईस जेटचं विमान मुंबई विमानतळाच्या धावपट्टीहून घसरल्याची घटना ३ जुलै रोजी घडली होती.  मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर असलेले स्पाईस जेटचं विमान तब्बल तासांनंतर धावपट्टीवरून बाजूला करण्यात यश आले आहे. धावपट्टीहुन घसरलेले स्पाईस जेटचे विेमान सुमारे ५६ तसाच्या अथक प्रयत्नानंतर धावपट्टी हुन बाजूला करण्यात यश आले आहे. अजूनही मुख्यधावपट्टी बंद आहे.विमान बाजूला केल्याने आज धावपट्टी सुरू होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबईतील विमानतळावर स्पाईसजेट कंपनीचे जयपूर ते मुंबई विमान सोमवारी रात्री धावपट्टीवरून घसरले. यामुळे मंगळवारी रात्रीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ५२ उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यावेळी ५५ विमानांचे मार्ग बदलण्यात आले होते तर १०० हून अधिक विमानांच्या वेळात बदल करण्यात आला होता. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विमानतळाची मुख्य धावपट्टी गुरुवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी स्पाईस जेटचं विमान धावपट्टी घसरल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता.