दीपक भातुसे, मुंबई : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावीच्या परिक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हाला शिक्षणाचा खेळखंडोबा करायचा आहे का? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला  होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतरही राज्य सरकार दहावीच्या परीक्षा न घेण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


 दहावीच्या विद्यार्थ्यांना कसं उत्तीर्ण करायचं याबाबत लवकरच राज्य सरकारचा निर्णय अपेक्षित आहे.  विद्यार्थ्यांना गुण कसे द्यावे याबाबत सोमवारी शिक्षणमंत्री निर्णय घेणार आहेत.  शिक्षण विभागाच्यावतीने विद्यार्थींना कसं उत्तीर्ण केलं जाणार, गुण कसे दिले जाणार हे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.
 
 परीक्षा रद्द केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालायने काल नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता परीक्षेची शक्यता मावळली आहे. अशी राज्य सरकारची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.