मुंबई : ST bus strike : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. (MSRTC Strike) काही ठिकाणी खासगी चालकांची मदत घेत शिवशाही आणि शिवनेरी बस सुरु करण्यात आला आहेत. तर रायगड जिल्ह्यात महाड येथे काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. पुणे, नाशिक आणि सांगली येथे शिवशाही बस सुरु करण्यात आल्या आहेत. संप तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचवेळी मुंबईत आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. यावेळी  तुम्ही संप मोडून काढाल तर तुमचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot) यांनी सरकारला दिला आहे.


एसटीचा संप चिरडणार?, सरकार 2500 नव्या उमेदवारांना तातडीने करणार रुजू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे राज्य सरकारने चर्चेची तयारी दाखवली आहे. मात्र, आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी सरकारवर आरोप केले आहे. परिवहनमंत्री अनिल परब तुम्ही चर्चेला कधी बोलावताय आम्ही तुमच्या निरोपाची वाट बघत बसलोय, असे सदाभाऊ खोत म्हणाले.


सर्व विरोधी पक्षांना आवाहन करत आहोत, या आंदोलनात सहभागी व्हा. ही लढाई रस्त्यावर नेऊ. अनिल परब तुम्हाला मी इथे चर्चेसाठी बोलावतोय सगळ्यांसमोर चर्चा करू स्वतः विरोधी पक्षनेते उपस्थित राहतील. विलिनीकरण हे झालंच पाहिजे. आत्महत्या होत आहेत ते तुम्हाला दिसत नाहीत का?, उद्या आंदोलन आणखी तीव्र करणार 10 वाजता आझाद मैदानावर बोर्ड घेऊन कुटुंबासहित बसणार आहोत, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिला.


 गेले तीन दिवस झाले आझाद मैदानात आपण आहोत. सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. डेपो प्रमुख यांना हाताशी धरून बस सुरू करण्याचा मानस आहे. कर्मचाऱ्यांचं निलंबन सुरूच आहे. सरकारकडे स्पष्ट मागणी आहे, विलिनीकरण करणार का, किती दिवसात करणार. मी परिवहन परब यांच्यासोबत स्वतंत्र बैठक केली नव्हती. सर्वांसमोरच बैठक झाली. परब खोटे बोलत आहेत. त्याचा मी निषेध करतो, असे सदाभाऊ खोत म्हणाले.


परिवहन मंत्री पदावर राहण्याचा अधिकार तुम्हाला नाही. अनिल परब यांचा मुख्यमंत्री यांनी तातडीने राजीनामा घ्यावा नवीन परिवहन मंत्री सोबत चर्चा करायला तयार आहोत. शिवशाही आधी बंद करा कारण ही खासगी मालकाची गाडी आहे. तिच्यावर वाहक एसटीचा डिझेल एसटीचे प्रतिकिलोमीटर 18 रु एसटीचे. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा मलिदा खात आहेत. टायर खर्च 20 रुपये त्यातही मोठा भ्रष्टाचार होत आहे, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.