मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Workers Payment Issue) तीन महिन्याचे पगार राहीलेयत. पुढच्या अर्ध्या तासात एक महिन्याचे वेतन मिळेल आणि दिवाळीच्या आधी दुसरे वेतन मिळेल असे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी म्हटले.  पत्रकार परिषदेत माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकार देखील आर्थिक संकटात आहे. पण हताश होऊ नका. आत्महत्या करु नका. हे तात्पुरते संकट आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे जीवन पुर्वपद करण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यामुळे टोकाचे पाऊल उचलू नको असे आवाहन परब यांनी केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर्ण वेतन मिळावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. यासाठी बॅंकेकडे कर्ज मागितले आहे. राज्य शासनाला विनंती केल्याचे ते म्हणाले.


गेल्या काही दिवसात २ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. दिवाळीच्या पार्श्वभुमीवर कर्मचारी चिंतेत आहेत. दोन महिन्याचे पगार द्या आणि तिसऱ्या महिन्याचा पगार कधी देणार ते सांगा असे इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी म्हटलंय. अन्यथा आमचा नाईलाज होईल असे म्हटलंय.



एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या


रत्नागिरी एसटी डेपोतील चालक पांडुरंग गडदे यांचा मृतदेह त्यांच्या रहात्या खोलीत आढळून आल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. या चालकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली असली तरीही त्यांच्या आत्महत्येचं कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. 
पण, मागील काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर अद्यापही तोडगा न निघाल्यामुळंच चालकानं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


दरम्यान, पगाराची तारीख उलटूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्याता पगाराची रक्कम जमा झालेली नाही त्यामुळं सातत्यानं तीन महिने हाच प्रकार सुरु राहिल्य़ामुळं सणावाराच्या दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांपुढं मोठी अडचण उभी राहिल्याचं पाहायला मिळत आहे. 


कोरोना काळातही महाराष्ट्र लॉकडाऊनमध्ये असताना एसटी कर्मचाऱ्यांना प्रवाशांना अविरत सेवा देत संकटसमयीसुद्धा आपली सेवा बजावली. पण, हया कोरोना योद्ध्यांकडे मात्र शासनाचं दुर्लक्षच होत असल्याचं पाहायला मिळत असल्यामुळं सध्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष पाहायला मिळत आहे.