दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांच्या स्टाफमध्ये कोरोनाचा शिरकाव; अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव
Omicron-led third wave : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे कार्यालय आणि घरी अनेकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
मुंबई : राज्यातील अनेक मंत्री आणि आमदार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे कार्यालय आणि घरी कोरोना अनेकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या स्टाफला कोरोनाचा विळखा बसला आहे. त्यांच्या कार्यालयातील 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
कार्यालयातील अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याने संपर्कात आलेल्यांनी चाचण्या केल्या. अद्याप 15 जणांचे अहवाल येणे बाकी आहे.
गृहमंत्र्यांच्या खाजगी सचिवासह इतर कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची बाधा झाली आहे.
दरम्यान, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील आणि बंगल्यावरील 22 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव आले आहेत.