मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या एलफिन्स्टन-परळ पुलावरील चेंगराचेंगरीत २२ जणांचा बळी गेलाय. या दुर्घटनेवरुन शिवसेनेने भाजपवर निशाणा साधलाय. आधी रेल्वेच्या समस्या दूर करा आणि नंतर बुलेट ट्रेन आणा, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाच्या फूटओव्हर ब्रिज येथे झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर एनडीएच्या सहयोगी शिवसेनेने सरकारला लक्ष्य केले आहे. शिवसेनेचे आमदार अजय चौधरी म्हणाले की, केंद्र सरकार लोकांना मुलभूत सुविधा पुरवू शकत नाही. पण बुलेट ट्रेन बद्दल चर्चा केली जात आहे. 
शुक्रवारी एलफिन्स्टन स्टेशनवरील फूटओवर पूलवरील चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू झाला आणि ३० जण जखमी झाले. जखमी झालेल्या २० जणांची स्थिती अत्यंत गंभीर आहे.



फूटोव्हर ब्रिज येथे पावसामुळे अधिक लोक जमले होते. सकाळी १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. पाऊस सकाळी मुंबईत सुरु झाला. ज्यानंतर पाऊस थांबण्यासाठी वाट पाहणाऱ्यांची पुलावर गर्दी झाली. दरम्यान, पुल कोसळल्याची अफवा पसरली. यानंतर लोकांमध्ये घबराट पसरली. 


पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भकड यांनी सांगितले की, पावसामुळे स्टेशनवर अन्य दिवसांपेक्षा अधिक गर्दी होते. ते म्हणाले की ही घटना सकाळी १०.३०वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. बचाव पथके घटनास्थळी आहेत.  


प्रत्यक्षदर्शींच्या मते हा अपघात अचानक झाला, त्यामुळे कोणालाही काहीही समजले नाही. किमान १० ते १५ मिनिटे एक मोठा अपघात झाला. चेंगराचेंनंतर अनेक महिला बेशुद्ध झाल्या होत्या.