काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारक जाहीर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्टार प्रचारक उतविण्यात येणार आहेत.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्टार प्रचारक उतविण्यात येणार आहेत. यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी प्रतंप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा आदींचा समावेश आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेसकडून निवडणूक आखाड्यात रंगत येणार आहे.
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. दोन्ही पक्ष समसमान जागा लढवत आहेत. राष्ट्रवादीकडून अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, छगन भुजबळ, डॉ. अमोल कोल्हे असणार आहेत. त्यामुळे आघाडीकडून जोरदार प्रचाराची आखणी करण्यात आल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर जाहीर करण्यात आली आहे. यात सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग, प्रियंका गांधी-वाड्रा, राहुल गांधी यांच्यासह गुलाम नवी आझाद, ज्योतिराजे शिंदे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सचिन पायलट, शत्रुघ्न सिन्हा, नाना पटोले यांचा समावेश आहे.