मुंबई : राज्यात पेटलेल्या शेतकरी संपानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज होत आहे. पण याबैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारली आहे. शिवसेनेने बहिष्कार टाकल्याने चर्चा सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेने शेतकरी संपाला पाठिंबा दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकताना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक सुरु आहे. दरम्यान कॅबिनेटच्या बैठकीआधी सर्व शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र भेट घेतली. 


या बैठकीनंतर हे सर्व कॅबिनेटच्या बैठकीत येतील अशी अपेक्षा होती. पण तसं झालेलं नाही. सध्या फक्त भाजपच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत कॅबिनेटची बैठक होतेय. आजच्या बैठकीत ३१ ऑक्टोबरच्या आत अल्पभूधारक शेतकऱ्ंयाच्या कर्जमाफीचा प्राथमिक आराखडा मांडला जाण्याची शक्यता आहे.